Jammu Kashmir Election । जम्मू-काश्मीर मध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत . विधानसभेसाठी याठिकाणी प्रत्येकपक्ष जोरदार प्रचार करत आहे. त्यातच काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी देखील याठिकाणी पक्षाचा प्रचार केला. यावेळी त्यांनी “जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आहे आणि जेव्हा त्यांचा पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा येथे खरी शांतता प्रस्थापित होईल.” असे आश्वासन त्याठिकाणच्या जनतेला त्यांनी दिले. कन्हैया कुमार म्हणाले की, “मौन आणि शांतता यात फरक आहे. याठिकाणी मौनाच वातावरण आहे आणि आपल्याला खरी शांतता आणायची आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांच्या प्रचारासाठी कन्हैया कुमार येथे आले होते. जे आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत दुररू मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार आहेत. कन्हैया कुमार म्हणाले की, “गेल्या 10 वर्षांत जम्मू-काश्मीरमधील जनतेवर झालेल्या दडपशाहीविरोधात प्रचंड संताप आहे. यावेळी काश्मीरमध्ये मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असेल, असा आमचा विश्वास आहे. यावेळी ते म्हणाले की, “हे मतदान अत्याचार, बेरोजगारी, जम्मू-काश्मीरमधील जनतेवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि राज्याचे हक्क परत मिळवण्यासाठी असेल.” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. कन्हैया कुमारने भाजपवर हल्लाबोल केला Jammu Kashmir Election । काँग्रेस नेत्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर वाईट हेतू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “जे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत ते खरे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गुलाम आहेत. त्यामुळेच यावेळची जम्मू-काश्मीरमधील निवडणूक दोन शक्तींमधील लढत असल्याचे ते म्हणाले. एका बाजूला द्वेष पसरवणारे आहेत तर दुसरीकडे प्रेम पसरवणारे आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या हक्कांसाठी लढणारे आहेत.” असेही त्यांनी म्हटले. एका वृत्तसंस्थेनुसार, कन्हैया म्हणाला की, “निवडणूक ही दोन विचारसरणींमधील लढाई आहे. एका बाजूला नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती आहे आणि दुसऱ्या बाजूला इतर सर्वांची युती आहे, जी मूलत: भाजपची युती आहे. ही लढाई प्रेम आणि द्वेष, न्याय आणि अन्याय यांच्यातील आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही, हे येथील जनतेला समजले आहे, असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये मतदान कधी? Jammu Kashmir Election । 90 सदस्यीय जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार असून मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.