Jammu Kashmir Attack : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
Updated On:

Jammu Kashmir Attack – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात झाली. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित संघटनेचे सदस्य आहेत.
त्यामध्ये शाहिद कुट्टे या तोयबाच्या म्होरक्याचाही समावेश असल्याचे समजते. शोपियॉंमधील संबंधित ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली.
सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये शाहिदसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील काही दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामध्ये शाहिदच्या शोपियॉंमधील घराचाही समावेश होता.





