J& K Assembly Elections: माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गांदरबलमधून दाखल केली उमेदवारी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गंदरबलमधून उमेदवारी दाखल केल्याचे वृत्त आहे. ते बडगाम विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात, अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. ( jammu kashmir assembly elections 2024)
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओमर अब्दुल्ला खूपच भावूक झाले. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणुकीत माझ्या सन्मानाचे रक्षण करा, असे मी हात जोडून तुम्हाला आवाहन करतो, असे उमर यांनी लोकांना सांगितले.
Ganderbal, J&K: JKNC Vice President Omar Abdullah says, “I have filled the (nomination) papers from Ganderbal. Let’s not talk about who is contesting from where. The people of Ganderbal have elected me thrice as a member of Parliament and once as an MLA…I gave up my seat to… pic.twitter.com/QpDWHAcs1K
— ANI (@ANI) September 4, 2024
गांदरबलमधून उमेदवारी दिल्यानंतर काय म्हणाले ओमर?
ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘मी गांदरबलमधून (नामांकन) फॉर्म भरला आहे. गांदरबलच्या जनतेने मला तीनदा खासदार आणि एकदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. इश्फाक जब्बारसाठी मी माझी जागा सोडली कारण मी त्यांना तसे करण्याचे आश्वासन दिले आणि नंतर ते आमदार झाले पण त्यांनी गांदरबलच्या लोकांचा विश्वासघात केला. आज आपण गांदरबलच्या विकासासाठी निवडणूक लढवणार आहोत.
भाजपला लक्ष्य –
नुकतेच उमर म्हणाले होते की, भाजपच्या विरोधात एकजूट दाखवून त्यांच्या जागा कमी करणे हा त्यांचा उद्देश आहे. पीर पांचाल आणि चिनाबसह जम्मूमध्ये निश्चितपणे युतीची गरज असल्याचे एनसी उपाध्यक्षांनी म्हटले होते. ते म्हणाले, ‘भाजपच्या विरोधात संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांनी कमीत कमी जागा जिंकाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत.





