जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये मोठा अपघात ; सीआरपीएफचे वाहन दरीत कोसळून दोन जवानांचा मृत्यू

Jammu Kashmir accident। जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी सीआरपीएफच्या बंकर वाहनाला अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बसंतगड परिसरातील कांडवा भागात हा अपघात झाला, ज्याठिकणी वाहनाने अचानक नियंत्रण गमावून रस्त्यावर उलटले. या अपघातात २ सीआरपीएफ जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर १२ इतर जवान जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बंकर वाहनात एकूण २३ जवान होते. गाडी कांडवा-बसंतगड रस्त्यावर येताच गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली. अपघातानंतर परिसरात गोंधळ उडाला. स्थानिक लोकांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. Jammu Kashmir accident।
Udhampur:
Disturbing to receive the news of a road accident involving a CRPF vehicle in the Kandva–Basantgarh area. The vehicle was carrying several brave jawans of the CRPF.I have just now spoken to DC Ms. Saloni Rai, who is personally monitoring the situation and keeping me…
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) August 7, 2025
या प्रकरणाबाबत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) संदीप भट म्हणाले की, अपघातात दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला आणि जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडल X वर एका पोस्टमध्ये अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्हा उपायुक्त सलोनी राय यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलले आहे. त्यांनी सांगितले की मदत कार्यावर लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक लोक देखील मदतीसाठी पुढे आले आहेत असेही मंत्र्यांनी सांगितले. सध्या पोलीस अपघाताचे कारण तपासत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, खराब रस्ता आणि वाहनाचा तोल जाणे हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. Jammu Kashmir accident।





