जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक ; दहशतवाद्याचा खात्मा, एके-४७ सह दारूगोळा जप्त

Jammu and Kashmir clash । जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा याठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत एका दहशतवादीचा खात्मा झाला आहे. त्याच्याकडून एके-४७ आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. सुरक्षा दलांना या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली.
दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर चकमक Jammu and Kashmir clash ।
अधिकाऱ्यांनी या चकमकीविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, सुरक्षा दलांना परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. जचलदारा येथील क्रुम्हुरा गावाला सुरक्षा दलांनी वेढले होते. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाले.
#Encounter has started at Krumhoora Zachaldara area of #Handwara. Police and security forces are on the job. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) March 17, 2025
या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला असून त्याच्याकडून एके-४७ आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. उर्वरित दहशतवाद्यांचाही शोध सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती दिली होती की, हंदवाडाच्या कृमुरा जचलदरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान शोध मोहीम राबवत आहेत.
१९ जानेवारी रोजी सोपोरमध्ये चकमक Jammu and Kashmir clash ।
१९ जानेवारी रोजी सोपोर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र, दोन्ही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी सांगितले होते की मिळालेल्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दल सोपोरच्या जालोर गुर्जरपतीमध्ये शोध मोहीम राबवत होते. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली आणि बराच वेळ चालू राहिली आणि सुरक्षा दलांना चकमा देऊन दहशतवादी पळून गेले.





