Jammu and Kashmir – जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी अपघात घडला. लष्कराचे एक वाहन रस्त्यालगतच्या दरीत कोसळले. त्या अपघातात ५ जवान मृत्युमुखी पडले. तर, आणखी ५ जवान जखमी झाले. संबंधित अपघात पूॅंच जिल्ह्यात घडला. त्याबाबतची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्या कार्यात लष्कर आणि पोलिसांची पथके सहभागी झाली. लष्करी वाहन कोसळले ती दरी ३०० ते ३५० फूट खोल असल्याचे समजते. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. अपघाताविषयीचा अधिक तपशील मिळू शकला नाही. बहुधा चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.