जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला ; राजौरीमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार

Jammu and Kashmir । जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला आहे. हा हल्ला सुंदरबनी परिसरात झाला.
कोणतीही जीवित हानी नाही Jammu and Kashmir ।
सुंदरबनीतील एका गावात दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीच्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर एक ते दोन राउंड गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी लष्कराचे वाहन गस्त घालत होते. या हल्ल्यात अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही.
सात पाकिस्तानी घुसखोरांना ठार Jammu and Kashmir ।
यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी भारतीय सैन्याने सात पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले होते. याआधीही दहशतवाद्यांनी अनेक वेळा अॅम्बशद्वारे हल्ला केला आहे आणि प्रत्येक वेळी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: तारीख काही ठरेना! पुन्हा एकदा इच्छुकांच्या पदरी निराशा





