जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट ; स्फोटात लष्कराचे ६ जवान जखमी

Jammu and Kashmir । जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) सुरुंग स्फोट झाल्याची मोठी घटना समोर आली आहे.
गस्त घालत असताना अचानक स्फोट Jammu and Kashmir ।
समोर आलेल्या माहितीनुसार, ‘लष्कराचे जवान गस्त घालत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट आज सकाळी १०.४५ वाजता झाल. ही घटना घडली तेव्हा ५/३ गोरखा रायफल्स (GR) ची एक तुकडी खांबा किल्ल्याजवळ गस्त घालत होती.
जखमींमध्ये हवालदार एम. गुरुंग (४१), हवालदार जे. थप्पा (४१), हवालदार जंग बहादूर राणा (४१), हवालदार आर. राणा (३८), हवालदार पी. बदर राणा (३९). हवालदार व्ही. गुरुंग (३८) हे सैनिक आहेत.
जखमींची प्रकृती स्थिर Jammu and Kashmir ।
अपघातात जखमी झालेल्या सर्व सैनिकांना उपचारासाठी राजौरी येथील १५० जनरल हॉस्पिटल (GH) मध्ये नेण्यात आले आहे. अहवालांनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.





