Jamkhed News : जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य गेल्या चार वर्षांपासून जामखेडच्या (Jamkhed News) भूमीत सातत्याने सुरू आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आयोजित होणारा ‘संयुक्त जयंती महोत्सव’ यंदाही आपल्या भव्यतेची परंपरा कायम राखणार आहे. केवळ राजकारण न करता समाजकारण (Jamkhed News) आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची संध्या सोनावणे यांची ही शैली सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. संध्या सोनवणे या आजच्या काळातील एक तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेत्या म्हणून उदयास आल्या आहेत. गेल्या चार वर्षांपासून जामखेडमध्ये त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम केवळ एक सोहळा उरला नसून, तो विचारांचा उत्सव बनला आहे. विशेषतः युवतींच्या प्रश्नांवर काम करतानाच, त्यांना संघटित करून महापुरुषांच्या विचारांची शिदोरी देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या संवादामुळे त्यांनी अल्पावधीतच जामखेडकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. Jamkhed News विचारांचा जागर आणि संस्कृतीचा संगम ’संयुक्त जयंती महोत्सव २०२६’ च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रिमूर्तींच्या विचारांचा संगम पाहायला मिळणार आहे. “जल्सा तोच, रूप नवे” ही संकल्पना घेऊन यंदाचा सोहळा अधिक आकर्षक करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे लाडके कलाकार उत्कर्ष शिंदे आणि राधा खुडे आपल्या सुरांनी प्रबोधनाचा जागर करणार आहेत. कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची ही कलात्मक दृष्टी त्यांच्या दूरदृष्टीचा परिचय करून देते. या सोहळ्याचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेता, राज्याच्या राजकारणातील (Jamkhed News) मोठी नावे या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. छगन भुजबळ, राम शिंदे आणि सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आ. काशिनाथ दाते, आ.मिरा घोडे, चंद्रशेखर घुले पाटील, अशोक सावंत, कपिल पवार, संजय कोकणे, सुभाष लोंढे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. पक्षाच्या सीमा ओलांडून सर्वसमावेशक कार्यक्रम राबवण्याचे कौशल्य त्यांनी या नियोजनातून दाखवून दिले आहे. शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता, तहसील कार्यालयासमोर होणाऱ्या या सोहळ्यासाठी जामखेडमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या स्वतः प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा सोहळा अविस्मरणीय वाटेल. युवती प्रदेशाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्या स्थानिक भागाकडे दुर्लक्ष न करता, जामखेडला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या त्यांच्या या ‘व्हिजन’चे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. या भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.