जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण : जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर; सरकारकडून कारवाईस सुरुवात

मुंबई : जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी संध्याकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे.
जालना जिल्ह्यात झालेल्या संपुर्ण प्रकारानंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे एका वृत्तवाहिनेने म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावातील गावकऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारच्या घटनेनंतर याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. त्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात आला होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत.





