Jalna Accident । जालन्यातील मंठा शहरात भीषण अपघाताची माहिती समोर येतीय. शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चार वर्षीय चिमुकली जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंठा येथील देवी रोडवर ही घटना घडली आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. आयशर ट्रकची जोरदार धडक Jalna Accident । याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा शहरातील देवी रोडवर शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह, सहा वर्षीय मुलगी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात सहा वर्षीय मुलगी, महिला आणि एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान दुर्देवी अंत झाला आहे. तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार Jalna Accident । सीमा चव्हाण (24), मारिया पठाण (6) आणि रूपला राठोड वय 65 वर्ष असे मृतांचे नावे आहेत. तर या घटनेत इशिका चव्हाण ही चार वर्षाची चिमुकली मुलगी देखील जखमी झाली आहे. या घटनेनेनंतर आयशर चालक फरार झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. भीषण अपघातात तीन निष्पाप लोकांचा बळी गेल्याने मंठा शहरासह परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन कडक शिक्षा करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.