School Timings Change : महत्त्वाची बातमी..! राज्यात उष्णतेची लाट; ‘या’ जिल्ह्यातील शाळा – कॉलेजच्या वेळेत मोठा बदल, वाचा सविस्तर..
School Timings Change : जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या वेळेत बदल केला आहे.

School Timings Change : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिली. School Timings Change
शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा मधला मार्ग काढण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

School Timings Change
दरम्यान, हवामान खात्याने येत्या १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून विदर्भ आणि मराठवाडा भागात उष्णता अधिक जाणवत आहे. School Timings Change :
अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.



