करवा चौथ रात्र ठरली अखेरची: पत्नीने ट्रेनसमोर उडी मारली, पतीने घेतला गळफास

जयपूर – राजस्थानच्या जयपूरमधून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये करवा चौथच्या रात्री एका जोडप्याने आत्महत्या केली. पत्नीने ट्रेनसमोर उडी मारली आणि रुळांवर तिच्या मृतदेहाचे तुकडे पाहून पतीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. घरी गेल्यानंतर त्यानेही गळफास घेतला. घटनेआधी रात्री उशिरा पती घरी आल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने भावाला व्हॉट्सॲप मेसेजही केला होता. जोपर्यंत भावाने मेसेज वाचला. तोपर्यंत त्याने आपले जीवन संपवले होते. माहिती मिळताच हरमदा पोलीसांनी पुरावे गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कानवटीया रुग्णालयाच्या शवागारात पाठवला.
हरमदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात करवा चौथला पती घनश्याम (३८) घरी उशिरा आला. यावर पत्नी मोनिका (३५) रागावली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. मोनिका घराबाहेर निघून गेली, मोनिकाची समजूत घालण्यासाठी घनश्यामही तिच्या मागे धावला. तोपर्यंत पत्नी मोनिकाने रेल्वेसमोर उडी मारून मृत्यूला कवटाळले.
मृत पतीने भावाला केला मेसेज –
जेव्हा घनश्यामने आपल्या पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे डोळ्यांसमोर पाहिले. मग त्याला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. घनश्याम लगेच घरी परतला. भावाला व्हॉट्सॲपवरून मेसेज केला. त्यावर लिहिले होते- “भाऊ, मी हरलो, माफ करा!” आता तुला माझ्या आयडीवर काम करावं लागेल. माझ्या पत्नीचा आज ट्रेनसमोर मृत्यू झाला. जोपर्यंत भावाने हा संदेश वाचला. तोपर्यंत घनश्यामने आपले जीवन संपवले होते. या जोडप्याला दोन आपत्य आहेत. एकाचे नाव आयुष (१३) आणि दुसऱ्याचे नाव निक्की (८) आहे. घनश्याम विणकर हे नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीत काम करायचे.
पत्नीच्या मृत्यूनंतर पतीच्या मृत्यूची माहिती मिळाली –
रात्री दीडच्या सुमारास रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळल्याची माहिती हरमदा पोलिसांना मिळाली. त्याची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. दुसरीकडे घनश्यामच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी लोकांच्या मदतीने मृतदेह लटकलेल्या अवस्थेतून खाली उतरवला. या प्रकरणी हरमदा पोलीस ठाण्याचे अधिकारी उदयभान यादव यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सर्व बाजूंचा तपास केला जाईल.





