गुंतवणूकदार झाले मालामाल! 50 पैशांवरून 15 रुपयांपर्यंत पोहोचला ‘हा’ शेअर, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Share Market News | भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी परतताना दिसत आहे. करेक्शननंतर आता अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड. अवघ्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.50 पैशांवरून 15 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच, 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेली व्यक्ती आज नक्कीच मालामाल झाली असते.
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज (19 मार्च) कंपनीचे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 14.76 रुपयांवर पोहोचले आहे. या वीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षात 2900 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअर्सची 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी 23.77 रुपये आहे. तर नीचांकी पातळी 12.35 रुपये आहे.
जानेवारी 2008 मध्ये कंपनीचे शेअर्स 137.10 रुपयांवर पोहोचले होते. तर कोव्हिडच्या काळात मार्च 2020 मध्ये शेअर्सचे मूल्य फक्त 50 पैसे होते. मागील 5 वर्षात शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे शेअर्स 2900 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. 19 मार्च 2025 ला कंपनीचे कंपनीच्या शेअर्सची किंमत 15.06 रुपयांवर पोहोचली होती.
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचे मार्केट कॅप 10 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. मागील 3 वर्षात शेअर्समध्ये 120 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. तर मागील वर्षभरात कंपनीच्या शेअर्सची किंमत स्थिर आहे.




