जय श्री राम !!! ‘आदिपुरुष’चा नवा मोशन पोस्टर रिलीज

मुंबई – ‘बाहुबली’ फेम साऊथ सुपरस्टार प्रभास त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या नवनवीन अपडेट्स एकामागून एक समोर येत आहेत. आदिपुरुषमध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची कथा दाखवण्यात येणार आहे. याआधी या चित्रपटाची कथा आणि लूक यावरून बराच गदारोळ झाला होता. मात्र यात काही प्रमाणात बदल केले आहेत.
आज अक्षय्य तृतीयानिमित्त दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे आणि खास मोशन पोस्टर शेअर केले आहे. ‘तेरे ही भरोसे है हम.. तेरे ही सहारे.. दुविधा कि घडी मे मन तुझको ही पुकारे.. तेरे ही बल से, हे बल हमारा.. तूही करेगा मंगल हमारा.. मंत्रोसे बढकर तेरा नाम.. जय श्री राम .. ‘ असे या मोशन पोस्टर मधील शब्द आहेत. सध्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या मोशन पोस्टरमध्ये प्रभास भगवान रामाच्या लूकमध्ये धनुष्यबाण घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे ‘आदिपुरुष’चा ‘जय श्री राम’हे पार्श्वसंगीत वाजत आहे. संगीतकार अजय-अतुल यांनी हे गाण संगीतबद्ध केले आहे. तर हे गाणं बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहे.
View this post on Instagram
या मोशन पोस्टरमध्ये दिसणारे दृश्य मागील टीझर-ट्रेलरपेक्षा उत्तम असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा बराच वाद झाला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेले VFX लोकांना फारसे आवडले नव्हते. त्यानंतर त्याचे प्रदर्शनही काही काळ पुढे ढकलण्यात आले. आता हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनॉन सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सैफ अली खान रावणच्या आणि देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.





