जान्हवी किल्लेकरचा स्वॅगच हटके, लवकरच झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत

Jahnavi Killekar New Marathi Serial : बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनने टीआरपीच्या बाबतीत सर्व विक्रम तोडले होते. या सीझनमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची विशेष चर्चा झाली होती. जान्हवी सीझनच्या फिनालेमध्ये 9 लाखांची बॅग घेऊन बाहेर पडली होती. सीझन संपला असला तरीही जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यातून आपल्या कामाबाबत माहिती देत असते. लवकरच ती लोकप्रिय मालिकेत झळकणार असून, याबाबत सोशल मीडियावर तिने माहिती दिली आहे.
जान्हवी स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये काम करताना दिसणार आहे. या मालिकेत ती इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही भूमिका साकारणार आहे. स्टार प्रवाहाने सोशल मीडियावर ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला असून, यात जान्हवीच्या भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
View this post on Instagram
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या पुढील भागामध्ये ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘अबोली’ मालिकेची टीम सहभागी होणार आहे. यावेळी अबोली मालिकेच्या टीमसोबत जान्हवी देखील सहभागी झालेली दिसेल. स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचा लूक शेअर केला आहे. प्रेक्षकांकडून या लूकला पसंती मिळत आहे.
दरम्यान, जान्हवी बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत झळकणार आहे. याआधी तिने ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत काम केले आहे.





