कामगार मृत्यू प्रकरणात जगन मोहन रेड्डींना मोठा दिलासा ; सुनावणी दरम्यान न्यायालयाने केला कुंभमेळ्याचा उल्लेख

Jagan Mohan Reddy । आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या रॅलीदरम्यान एका कामगाराचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी रेड्डी यांना अंतरिम दिलासा दिला आहे. सुनावणीदरम्यान, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या घटनेचा हवाला दिला. न्यायालयाने म्हटले की, “सर्व खबरदारी असूनही, कुंभमेळ्यात एक अपघात झाला.”
१८ जून रोजी जगन रेड्डी यांच्या ताफ्यातील एका कारने ५३ वर्षीय सी सिंगय्या यांना चिरडले. या अपघातानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा असे आढळून आले की ती कार जगन रेड्डी यांची आहे. यानंतर, पोलिसांनी कार जप्त केली आणि वायएसआरसीपी प्रमुख आणि इतर पक्ष सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
जगन रेड्डी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीJagan Mohan Reddy ।
जगन रेड्डी यांच्या या प्रकरणाची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्याठिकाणी न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे. जगन रेड्डी यांच्या वतीने या प्रकरणाविरुद्ध उच्च न्यायालयात रद्द करण्याची याचिका दाखल करण्यात आली. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका वृत्तानुसार, त्यांनी त्यांच्या अपीलात आरोप केला आहे की त्यांचे नाव जाणूनबुजून आरोपी म्हणून जोडले गेले आहे. जगन यांनी त्यांच्या अपीलात म्हटले आहे की मला अडकवले जात आहे.”
अपघातानंतर रेड्डी यांच्यावर टीका Jagan Mohan Reddy ।
जगन रेड्डी यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती, परंतु रेड्डी आणि त्यांच्या पक्षाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी झेड प्लस सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये चूक केल्याचा आरोप केला. रेड्डी म्हणाले की, “सरकारने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. मात्र, आता रेड्डी यांना दिलासा मिळाला आहे.”
हेही वाचा
बिहारमध्ये काँग्रेसचा राजदला मोठा दिलासा ; मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची केली घोषणा





