‘एका महिलेपासून २५ मुले जन्माला घालणं अन् नंतर तिहेरी तलाक..’, रामभद्राचार्य यांचे वादग्रस्त विधान

Jagadguru Rambhadracharya। उत्तर प्रदेशातील मेरठ याठिकाणी रामकथेदरम्यान जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी,”हिंदूंमध्ये मुली देवी आहेत आणि इतरत्र त्या बेबी आहेत. इस्लाममध्ये महिलांची स्थिती दयनीय आहेत. महिलांना २५ मुलांना जन्म द्यावा लागतो आणि नंतर त्यांना तिहेरी तलाक दिला जातो. ते म्हणाले की, महिलांना आपल्या धर्मात use and throw केले जात नाही.” असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”हिंदू धर्माइतका उदार धर्म दुसरा कोणताही असू शकत नाही. काही धर्मांमध्ये महिलांना बेबी म्हणतात. काही पंथांमध्ये महिलांना बीबी म्हणतात. फक्त हिंदू धर्म असा आहे जिथे महिलांना देवी म्हणतात.’ असे म्हटले.
मुलांना कॉन्व्हेंट किंवा मदरशांमध्ये पाठवू नका Jagadguru Rambhadracharya।
लोकांना आवाहन करताना रामभद्राचार्य यांनी,” हिंदू समाजाने त्यांच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळा किंवा मदरशांऐवजी संस्कृत शाळांमध्ये शिक्षण द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि मंगल पांडे सारखी मुले बनवा. मुलांना सरस्वती विद्यालयात पाठवण्याचा प्रयत्न करा.” असेही त्यांनी म्हटले. ते म्हणाले की, मनुस्मृतीमध्ये जाती निर्माण झाल्या होत्या, परंतु आजच्या राजकीय पक्षांनी त्यांना जातीवादात रूपांतरित केले आहे आणि सत्ता मिळविण्याचे साधन बनवले आहे.
रामभद्राचार्य यांनी पश्चिम उत्तर प्रदेशला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले होते
रामभद्राचार्य यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, ‘पश्चिम उत्तर प्रदेश एक मिनी पाकिस्तानसारखा दिसतो. हिंदू संकटात आहेत, हिंदू धर्माला न्याय मिळत नाही. आपला धर्म वसुधैव कुटुंबकम शिकवतो. आपण कोणाचाही द्वेष करत नाही, परंतु आता हिंदूंना आवाज उठवून त्यांची ओळख आणि धर्माचे रक्षण करावे लागेल.’
विरोधकांची टीका Jagadguru Rambhadracharya।
रामभद्राचार्य यांच्या विधानावर समाजवादी पक्षाचे सरचिटणीस शिवपाल यादव यांनी, ‘त्यांना काहीही दिसत नाही. त्यांच्या मदतीने सरकार स्थापन झाले आहे आणि त्यांचे राज्य चालू आहे. मला अशा विधान करणाऱ्यांवर दया येते.’असे म्हटले.
सपा नेते एसटी हसन म्हणाले की, “जर ते अशी विधाने देत नसतील तर त्यांचे व्यवसाय कसे चालतील”. हसन म्हणाले की, अशी विधाने करून रामभद्राचार्य समाजात भीती आणि फूट निर्माण करत आहेत जेणेकरून त्यांची ‘दुकानदारी’ चालू राहील आणि एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा होईल. ते म्हणाले की, पश्चिम उत्तर प्रदेशात हिंदू आणि मुस्लिम भावासारखे राहतात, ते सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. वाद वाढल्यानंतर रामभद्राचार्य यांनी पुन्हा सांगितले की, आम्ही आजही म्हणतो. संभलमधून हिंदू का स्थलांतरित होत आहेत. मुझफ्फरनगरमध्येही हिंदूंचे वर्चस्व आहे, हे का घडत आहे.





