मुंबई – अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखर प्रकरणासोबत जॅकलीनचे नाव आले आहे. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली येथे तुरुंगात आहे. याप्रकरणी तिची अनेकदा चौकशीही करण्यात आली आणि ईडीने तिची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती. याशिवाय या अभिनेत्री नोरा फतेहीचे देखील नाव जोडले गेले होते. मात्र आता जॅकलीन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. जॅकलीन फर्नांडिसने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. अत्यंत महागडे आलिशान घर जॅकलीन फर्नांडिस हिने खरेदी केले आहे. जॅकलीनच्या नव्या घरावळ दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, करिना कपूर, सैफ अली खान हे सेलेब्रिटीही राहतात. जॅकलीनचे हे घर मुंबईतील बांद्रा पश्चिम भागामध्ये आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी देखील याच परिसरात अजून एक घर खरेदी केले आहे. जॅकलीनचे पाली हिल या पॉश परिसरात हे घर आहे. या इमारतीमधील प्लॅटची किंमत ही 12 कोटींपासून सुरू होते. या इमारतीतील सर्व घरे 1119 स्क्वेअर फूट 2557 स्क्वेअर फूट कार्पेट एरियामध्ये बांधलेली आहेत. या इमारतीमध्ये 3 बीएचके आणि 4 बीएचके प्लॅट असून जिम आणि स्विमिंग पूल देखील आहे. जॅकलिनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलिन लवकरच वैभव मिश्राच्या ‘फतेह’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक क्राईम-अॅक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये ती सोनू सूद आणि विजय राजसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती आदित्य दत्तच्या अॅक्शन स्पोर्ट्स फिल्म ‘क्रॅक-जीतेगा तो जिएगा’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपाल देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.