जब्या अन् शालूचं ठरलं? ‘त्या’ फोटोंमुळे सोशल मीडियावर रंगल्या चर्चा, राजेश्वरी खरात म्हणाली “मला अजूनही…”

Somnath Awake | Rajeshwari Kharat | सोमनाथ अवघडे आणि राजश्री खरात हे दोघेही फँन्ड्री चित्रपटातून प्रसिद्ध झाले. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सध्या राजेश्री खरात हिने तिच्या इन्स्टाग्रामवरून दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोला राजेश्रीने दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंना चाहत्यांनेही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजश्रीने सोमानाथबरोबरचे लग्न मंडमातील फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर हळदीचे फोटोही शेअर केले होते. तेव्हापासून दोघांचं ठरलं असल्याच्या चर्चांना रंगल्या होत्या. अशातच अजूनही मला वाटतं स्वप्न आहे सगळं…’, असे कॅप्शन या फोटोंना राजश्रीने दिले आहे. त्यामुळे आत्ताही राजश्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे या चर्चा केल्या जात आहेत.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. पहिल्या फोटोत राजेश्वरी व सोमनाथ रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. तर दुसरा फोटो कँडिड असून, तिसऱ्या फोटोत ते कॅमेऱ्याकडे बघतानाचा आहे. राजेश्वरीने फोटोत गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. पण त्यांचे ठरलं नसून दोघेही आगामी आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दादा एक नंबर जोडी, जब्याला शेवटी काळी चिमणी घावली, फँड्री २ बनवा आता, भावा कुठल्या देवाला नवस केला होतास तू, काळ्या चिमणीची कृपा अशा काही कमेट्ंस या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटात शालू व जब्या या भूमिकांमुळे राजेश्वरी खरात आणि आकाश अवघडे यांना लोकप्रियता मिळवून दिली.
हेही वाचा: कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई; घरी चिमुकल्याचे आगमन





