‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई; घरी चिमुकल्याचे आगमन

Pooja Banerjee | ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जीने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. पूजा दुसऱ्यांदा आई झाली आहे, तिने एका गोंडस चिमुकल्याला जन्म दिला आहे. अभिनेत्री पूजा बॅनर्जीचे पती संदीप सेजवाल यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाल्याची माहिती दिली आहे. ज्यानंतर दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी संदीप म्हणाला की, “७ जून रोजी पूजाने मुलाला जन्म दिला. आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. पूजा आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.” तर पूजा बॅनर्जी म्हणाली, “आम्हाला ही बातमी सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे आणि आता आमचं चौकोनी कुटुंब आहे,” असं म्हणत दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. Pooja Banerjee |
View this post on Instagram
पूजा बॅनर्जीने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी राष्ट्रीय जलतरणपटू संदीप सेजवालशी लग्न केलं होतं. या जोडप्याला २०२२ मध्ये एक मुलगी झाली, जिचे सना असं नाव आहे. Pooja Banerjee |
पूजा बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने एमटीव्ही ‘रोडीज’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘एक दुसरे से करते हैं प्यार हम’, ‘चंद्रकांता’, ‘दिल ही तो है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच पूजाने ‘कहने को हमसफर हैं’ मधून ओटीटीवर पदार्पण केलं. सध्या तिने अभिनयापासून ब्रेक घेतला आहे. Pooja Banerjee |
हेही वाचा:
राणे विरुद्ध राणे ! “नितेशने जपून बोलावे, आपण महायुतीत…”; निलेश राणेंचा सल्ला

