Janhvi Kapoor : “….आईशिवाय इथे असणे विचित्र”; जान्हवी कपूर कान्स महोत्सवात सहभागी होताच झाली भावुक

Janhvi Kapoor : फॅान्समध्ये ७८ कान्स चित्रपट महोत्सव सुरू असून या महोत्सवाला बॅालीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने देखील कान्सला हजेरी लावली. २० मे रोजी ती रेड कार्पेटवरून वॅाक करत कान्स महोत्सवात सहभागी झाली. यावेळी जान्हवी कपूरचा कान्समधला लूक पाहून अनेकांना श्रीदेवीची आठवण आली. मात्र, कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर जान्हवी भावूक झाली होती. याविषयी तिने वोगसोबत बोलताना आई श्रीदेवी आणि कान्स महोत्सवाबद्दल आठवण सांगितली.
तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या आईची खूप आठवण येत होती. याचे कारण कान्स चित्रपट महोत्सव तिची आई श्रीदेवीची आवडती जागा होती. याविषीयीची आठवत सांगत ती म्हणाली, माझ्या आईचे हे अत्यंत आवडते ठिकाण होते. आम्ही इथे सलग ३-४ उन्हाळे घालवले आहेत. आमच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. या महोत्सवात आईला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच तिचे अनेक चित्रपटही दाखविण्यात आले आहेत, अशी आठवण जान्हवीने शेअर केली.
मला आठवतंय, टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये इंग्लिश विंग्लिशचा प्रीमियर असो, किंवा बाबा कुठेही शूटिंग करत असतील, किंवा आयुष्यातील कोणताही मोठा कार्यक्रम असो, आम्ही सर्वजण एकत्र साजरा करायचो. जान्हवी पुढे म्हणते, ‘आपण कान्समध्ये परतलो आहोत. माझे बाबा आणि खुशी माझ्यासोबत आहेत… आईशिवाय इथे असणे विचित्र आहे, असे तिने वोगसोबत बोलताना सांगितले.





