“इंदिरा गांधी होना आसान नही”; ते व्हिडिओ, फोटो शेअर करत काँग्रेसने मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

Congress criticizes PM Modi : भारताने पाकिस्तावर हवाई हल्ले करत पहलगाम येथील दहशतवादी हल्लाचा बदला घेतला. ७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर भारताने हवाई हल्ले करत ते उद्धवस्त केले. या हल्ल्यांमध्ये ३० हून अधिक दहशतवादी मारले गेले. गेल्या तीन दिवसांपासून भारत पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
अखेर शनिवारी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत युद्धविराम झाल्याची माहिती दिली. त्यानुसार आज सायंकाळी ५ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य कारवाया थांबल्या आहेत. यानंतर काँग्रेस पक्षाकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९७१ काळातील राजवटीतील काही जुने व्हिडिओ शेअर करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. इंदिरा होना आसान नही…असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया सिनेट यांनी ट्विट करत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.
इंदिरा गांधी होना आसान नहीं pic.twitter.com/lerjJq8w5U
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 10, 2025
भारत पाकिस्तान यांच्यातील सैन्य दलाच्या कारवाई थाबंल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर काँग्रेसकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९७१ च्या युद्धावेळी घेतलेल्या कणखर भूमिकेची व्हिडिओच्या माध्यमातून आठवण करून देण्यात आली आहे. त्यामुळे एक्स सोशल मीडियावर प्लॅटफॅार्मवर इंदिरा गांधी हा हॅशटॅग ट्रेन्ड केला जात आहे.
𝟏𝟗𝟕𝟏
जब पाकिस्तान ने भारत के सामने घुटने टेक दिए थे
🇮🇳🇮🇳 pic.twitter.com/yaOgUc4Gxx
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) May 10, 2025
नेमकं १९७१ साली काय घडलं होतं?
१९७१ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार २५ एप्रिल १९७१ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका बैठकीत भारताच्या लष्करप्रमुखांना पाकिस्तानला धडा शिकविण्याचे आदेश दिले होते. तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. या बैठकीत इंदिरा गांधीनी त्यांना सांगितले की अमेरिकेने पाकिस्तानला आवरले नाही तर भारताला नाईलाजाने कारवाई लागेल.





