ऐकावं ते नवलं ! मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडल्याने थेट कुत्र्याविरोधातच केली पोलीस तक्रार

आंध्र प्रदेश– आंध्र प्रदेशामधील विजयवाडामध्ये एका भटक्या कुत्र्याने मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर फाडले. याप्रकरणी त्या कुत्र्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचे म्हणत काही महिलांनी कुत्र्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचं पोस्टर कुत्र्याने फाडल्याचे दिसते. याप्रकरणाची दखल घेत टीडीपी नेता दसारी उदयश्री या काही महिलांसह पोलीस ठाण्यात गेल्या आणि थेट कुत्र्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडत असल्याने त्या कुत्र्याच्या विरोधात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Even dogs are not spared in #AndhraPradesh politics. After a video went viral over a dog tearing CM #Jagan‘s poster, #TDP woman leader Dasari Udayasree from #Vijayawada sarcastically files police complaint that action should be taken against the dog for insulting CM. pic.twitter.com/HEgaPYqPIS
— Krishnamurthy (@krishna0302) April 13, 2023
याप्रकरणी उदयश्री माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष 151 जागा जिंकून सत्तेवर आला आहे. अशा माणसाचे पोस्टर फाडून कुत्र्याने मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या सहा कोटी लोकांचा अपमान केला आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे.” दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडल्याने कुत्र्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. अनेक जण या आगळ्यावेगळ्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करत आहे.





