मुलगी झाली हो…! ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई

Ishita Dutta | ‘दृश्यम’ सिनेमातील अभिनेत्री इशिता दत्ता दुसऱ्यांदा आई झाली आहे. या सिनेमात इशिताने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. इशिता आणि तिचा पती वत्सल शेठ हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. आता त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
इशिताने सोशल मीडियावर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत इशिता, तिचा मुलगा, पती वत्सल सेठ दिसत आहेत. इशिताने बाळाचा चेहरा मात्र दाखवला नाही. इशिताने हा फोटो पोस्ट करुन कॅप्शनमध्ये, ‘दोन पासून चार हृदयं एकत्र धडधड करत आहेत. आमचं कुटुंब पूर्ण झालं. मुलीचा जन्म झाला,’ असे लिहिले आहे. इशिताने हा खास फोटो पोस्ट करताच चाहत्यांसह कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे. Ishita Dutta |
View this post on Instagram
इशिता दत्ताने अभिनेता वत्सल शेठसोबत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री जुळली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. १९ जुलै २०२३ ला त्यांना मुलगा झाला, ज्याचे नाव वायु आहे. त्यानंतर दोन वर्षांनी इशिता-वत्सल दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. Ishita Dutta |
हेही वाचा:





