अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट ; सुधारित ITR ची मुदत ४ वर्षांपर्यंत वाढवली

ITR Filing Time । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट दिली आहे .त्यासोबतच १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न देखील करमुक्त केले आहे. यासोबतच, आयटीआर (यू) दाखल करण्याची वेळ मर्यादा ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार जर तुम्ही चुकीचे आयकर रिटर्न भरले असेल, तर आयटीआर यू भरण्याची वेळ मर्यादा २ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटच्या क्षणी, अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकराबाबत या घोषणा केल्या ज्या सामान्य जनतेला आणि मध्यमवर्गाला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरणार आहे.
मध्यमवर्गीयांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा ITR Filing Time ।
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा केली आहे . आता १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. याअंतर्गत, नवीन कर स्लॅब देखील जारी करण्यात आले आहेत. मध्यमवर्गीयांना हे कर स्लॅब मोठा दिलासा देणारे ठरणार आहेत.
नवीन कर प्रणालीनुसार कर स्लॅब
१. ०-४ लाख = शून्य
२. ४ – ८ लाख = ५ टक्के
३. ८ – १२ लाख = १० टक्के
४. १२-१६ लाख = १५ टक्के
५. १६-२० लाख – २०%
६. २० – २४ लाख = २५ टक्के
७. २४ लाख आणि त्याहून अधिक = ३०%
• १२ लाख रुपयांपर्यंत (सरासरी मासिक उत्पन्न १ लाख रुपये प्रति महिना) उत्पन्नावर कोणताही कर नाही.
• पगारदार करदात्यांसाठी – १२.७५ लाख रुपये (७५,००० रुपयांच्या मानक वजावटीसह)
नवीन घोषणा जाणून घ्या ITR Filing Time ।
अर्थमंत्र्यांनी आयटीआर आणि टीडीएसची मर्यादा वाढवली आहे. टीडीएस मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवली. कर कपातीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. याद्वारे, तुम्ही चार वर्षांसाठी आयकर रिटर्न भरू शकाल. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करण्यात आली आहे, त्यांच्यासाठी कर सवलत ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.
राजकोषीय तुटीचा अंदाज देखील उत्साहवर्धक आहे.
२०२५ या आर्थिक वर्षासाठी राजकोषीय तूट ४.८ टक्के निश्चित करण्यात आली आहे, तर २०२६ या आर्थिक वर्षासाठी अंदाजे राजकोषीय तूट ४.४ टक्के ठेवण्यात आली आहे.





