बीजिंग : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चीनशी संबंध सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या चीनच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. ऑटो मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर क्षेत्रांमध्ये चिनी गुंतवणूक आकर्षित केल्यामुळे इटलीला युरोपियन संघाशी व्यापार युद्धाची भीती सतावते आहे. तरिही मेलोनी यांनी चीनच्या भेटीचा निर्णय घेतला आहे. मेलोनी यांनी आज चीनचे पंतप्रधान ली कियांग यांची भेट घेतली. चीन आणि इटलीच्या उद्योजकांच्या परिषदेलाही त्या उपस्थित राहणार आहेत. इटलीने काही महिन्यांपूर्वीच चीनच्या बेल्ट ऍन्ड रोड इनिशिएटिव्हमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत जगभरात रस्ते आणि उर्जा प्रकल्पांच्या पायाबूत सुविधांची उभारणी केली केली जाणार आहे. यातून चीनला इतर देशांशी व्यापारी संबंध अधिक घट्ट करण्याची संधी मिळणार आहे. इटलीने 2019 मध्ये बेल्ट ऍन्ड रोडमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. तेंव्हा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू होते. त्यामुळे इटलीचा निर्णय हा युरोपशी केलेली बंडखोरी समजला जात होता. मात्र या प्रकल्पातून इटलीला अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे इटलीच्या लक्षात आले. तसेच चीनबरोबरच्या जवळीकीमुळे युरोपाती इतर देशांशी इटलीचे संबंध बिघडले होते. त्यामुळे इटलीने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरिही इटलीला चीनबरोबरचे आर्थिक संबंध जपायचे आहेत. चीनच्या सहयोगातून वाहन उद्योगातील काही उद्योग इटलीला सुरू करायचे आहेत. मेलोनी या पाच दिवस चीनच्या दौऱ्यावर असणार आहेत.