इटलीच्या पीएम जॉर्जिया मेलोनींकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या काय म्हणाल्या त्या…

PM Narendra Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (17 सप्टेंबर) त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींना देशभरातून आणि परदेशातून वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश येत आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर केलेल्या एका विशेष संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
‘पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ –
एका पोस्टमध्ये जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला खात्री आहे की, जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी आम्ही इटली आणि भारत यांच्यातील मैत्री आणि सहकार्य आणखी मजबूत करू.”
Tanti auguri di buon compleanno al Primo Ministro dell’India @narendramodi. Sono certa che continueremo a rafforzare la nostra amicizia e la collaborazione tra Italia e India, per affrontare insieme le sfide globali che ci attendono 🇮🇹🇮🇳 pic.twitter.com/pqXo0ljK8F
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) September 17, 2024
दरम्यान, पीएम मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.
भाजपचा सेवा पंधरवडा –
पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवाडा सुरू करणार आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा चालणार आहे. या सेवा पंधरवड्यात भाजपचे कार्यकर्ते देशातील विविध समाज आणि घटकांशी संपर्क साधतील आणि समस्यांवर उपाय शोधतील. तसेच देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जॉर्जिया मेलोनी पत्रकार –
राजकारणात येण्यापूर्वी जॉर्जिया मेलोनी पत्रकार होत्या. वयाच्या ४५ व्या वर्षी त्या इटलीच्या पंतप्रधान झाल्या. जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी रोममध्ये झाला होता. त्यांना एक मुलगी देखील आहे, जॉर्जिया मेलोनी यांचे वडील अकाउंटंट होते. जॉर्जिया 2008 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी इटलीची सर्वात तरुण मंत्री बनल्या. जॉर्जियांनी 2021 मध्ये ‘I AM Giorgia’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे, जे चर्चेत होते.





