#hathrascase : “ते काही दिवसांनी निघून जाईल, आम्ही इथेच आहोत”

नवी दिल्ली / हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे म्हटले आहे.उत्तर प्रदेशचे पोलीस अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
यूपी सरकार किसी को पीड़िता के गांव जाने से क्यों रोक रही है उसका जवाब यहां है?
पीड़िता के परिवार को हाथरस डीएम जाकर धमका रहे हैं।
न मीडिया जा पायेगा, न हम लोग तो यूपी सरकार पीड़िता के परिवार को खुलकर धमका पाएगी।
ये लोग अत्याचारी हैं। pic.twitter.com/RDV2jrQfRn
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 1, 2020
यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर व्हिडीओ एक धक्कादायक शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार पीडितेच्या वडिलांना सांगत आहेत की, “अर्धी मीडिया आज गेली आहे, उरलेला उद्यापर्यंत गेलेले तुम्हाला दिसतील. फक्त आम्हीच इथे तुमच्यासोबत आहोत. आता आपला जबाब बदलायचा का नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे”.
दरम्यान, या व्हिडियोबाबत पत्रकारांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच पोलिसांनी अखेरचं एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरुन राजकारण तापल आहे .





