Akshay Kumar’s post for Asrani : ‘तो एक मास्टरक्लासच होता’; अनेक दिवसांनी अक्षय कुमार मनातलं बोलला; असरानीसोबतचा सुंदर फोटो केला शेअर
Akshay Kumar's post for Asrani : अक्षय कुमारने दिवंगत अभिनेते गोवर्धन असरानी यांच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.

Akshay Kumar’s post for Asrani : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधानानंतर कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आता अभिनेता अक्षय कुमाराने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत असरानीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Akshay Kumar’s post for Asrani
अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘भूत बंगला’ हा चित्रपट 17 एप्रिल या दिवशी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही चित्रपटगृहात 16 एप्रिल 2026 पासून पेड प्रिव्ह्यू शो सुरू झाले आहेत. या चित्रपटामुळे अक्षय कुमार चर्चेत असून, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, अक्षयने दिवंगत अभिनेते असरानी यांची आठवण काढली आहे. ‘भूत बंगला’मध्ये असरानी यांनी अक्षय कुमारसोबत काम केले आहे. अक्षयने पोस्टसोबत शेअर केलेला फोटो सिनेमाच्या शूटिंगसेटवरचा असल्याचे दिसते. या फोटोत दोघेही खुर्चीवर बसून स्प्रिप्ट वाचत चिंतन करत आहेत.
अक्षय कुमारची पोस्ट (Akshay Kumar’s post for Asrani)
कधीकधी एक फोटो केवळ आठवणींचा एक तुकडा नसतो… त्यात एक संपूर्ण प्रवास सामावलेला असतो. हा फोटो ‘आमच्या भूत बंगला’च्या चित्रीकरणादरम्यानचं आहे… असरानीजींसोबतचा माझा शेवटून दुसरा चित्रपट. आम्ही एकूण 12 चित्रपट एकत्र केले, आणि प्रत्येक चित्रपटात मी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकलो.. प्रत्येक वेळी तो एक मास्टरक्लासच होता, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. Akshay Kumar’s post for Asrani
पोस्टमध्ये अक्षयने पुढे म्हटले आहे, ते जेव्हा कॉमेडी करायचे तेव्हा ती खूप सोपी वाटायची, पण प्रत्यक्षात ती एक अवघड कला आहे. असरानीजी त्यात पारंगत होते आणि नेहमीच राहतील, असे कौतुकाचे उद्गार असरानींसाठी काढले.
View this post on Instagram
‘भूत बंगला’ उद्या प्रदर्शित होत आहे… माझ्यासाठी हा केवळ एक चित्रपट नाही, तर एक आठवण आहे… एक आदरांजली… त्या महान कलाकाराला एक सलाम असेही अक्षयने पोस्टमध्ये म्हटले आहे.
भूत बंगला हा चित्रपट हॉरर-कॉमेडी प्रकारातील असून, याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी आहेत. अनेक वर्षानंतर या चित्रपटातून प्रियदर्शन आणि अक्षयची जोडी एकत्र आली आहे. या चित्रपटात तब्बू, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.





