Naresh Mhaske : राऊतांनीच सांगितलं होतं…; नरेश मस्केंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ म्हणाले “रश्मी वहिनींनाही…”
Naresh Mhaske : "संजय राऊत फेकूचंद आहे. नरेश म्हस्के त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देतो. त्यांच्याबद्दल भोंगा वैगेरे अशा शब्दांची निर्मिती केली आहे, त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो.” अशा शब्दांत नरेश मस्केंनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

Naresh Mhaske : एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार व्यक्तिवाद करत आहेत. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत आणि खासदार नरेश मस्के यांच्यात शाब्दिक वार पलटवार रंगल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता नरेश मस्के यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
“संजय राऊत फेकूचंद आहे. नरेश म्हस्के त्यांना प्रत्येकवेळी उत्तर देतो. त्यांच्याबद्दल भोंगा वैगेरे अशा शब्दांची निर्मिती केली आहे, त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा राग मी समजू शकतो.” अशा शब्दांत नरेश मस्केंनी संजय राऊतांवर निशाणा साधला. पुढे बोलताना नरेश मस्के यांनी एक मोठा दावा केला. ते म्हणाले “अख्ख्या शिवसेनेला माहित आहे, ज्यादिवशी त्यांना राज्यसभेच तिकीट लवकर जाहीर होत नव्हतं, तेव्हा उद्धव ठाकरे सोडा, रश्मी वहिनींना किती शिव्या घातल्या होत्या.” यामुळे आता राऊत-मस्के यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन गुवाहटीला गेले होते. त्यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या. त्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. यावर आता नरेश मस्केंनी मोठा गौप्यस्फोट केला. “ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी पाऊल उचललं , त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा मला फोन आलेला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, तुम्हाला भेटायला येणार नाही. मला वर्षा बंगल्यावर बोलावलं त्यावेळी सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे साहेबांना बोलवा. अन्याय करु नका, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा.”असे नरेश मस्के यांनी सांगितले.
नरेश म्हस्केला तिकीट दिलं तर तो एकनाथ शिंदेंसोबत जाईल
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेसाहेबांसमक्ष मला सांगितलं होतं की, नरेश विधान परिषदेसाठी तुझं नाव आहे. तुम्ही अमशा पडवीला विधानसभेचं तिकीट दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेश म्हस्केला तिकीट दिलं तर तो एकनाथ शिंदेंसोबत जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याच तुम्हीच राऊत मला सांगितलत, असेही नरेश मस्के यांनी सांगितले. यावर आता संजय राऊत यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






