महाराष्ट्र सत्तासंघर्ष : चंद्रकांत खैरेंचा आरोप, म्हणाले “निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणाच शिंदे गटाला…”

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय यंत्रणा आणि निवडणूक आयोगाबाबत गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणाच शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
खैर पुढे बोलताना पुढे म्हणाले की, आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तरी काही यंत्रणा विरोधकांना बातम्या पुरवित आहेत. निवडणूक आयोगात आम्ही एखादा अर्ज दिल्यानंतर त्याच्या पाच मिनिटांपूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो. त्यामुळे कुठेतरी माहिती गहाळ होत आहे, असे खैरे यांनी म्हटले आहे.
केंद्र शासनाच्या काही यंत्रणा अशा आहेत की, आम्ही कोणता कागद किंवा अर्ज दिला आणि शिंदे गटाने कोणता कागद द्यावा, याबाबत त्यांना माहिती पुरवतात, असेही खैर यांनी पुढे म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/emphasis-on-prevention-of-tax-evasion-through-proper-use-of-technology-deputy-chief-minister-devendra-fadnavis/
शिंदे गटाचे वकिल हरिश साळवे यांनी महाराष्ट्रातील प्रकरणाचा निकाल हा नबाम रेबिया प्रकरणानुसार द्यावा असा दावा सुप्रीम कोर्टात केला आहे.





