“हे लष्कर प्रमुखांचे काम नाही’ – पी. चिदंबरम
Updated On:

तिरुवनंतपुरम : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलेल्या वक्तवव्याचा निषेध केला आहे. लष्करप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या डीजीपीना केंद्र सरकारला पाठिंबा देण्यास सांगितले आहे. ही लज्जास्पद बाब आहे, असा आरोपही त्यांनी केला.
चिदंबरम म्हणाले, “सरकारने आर्मीप्रमुखांना बोलण्यास सांगितले आहे. हे लष्कर प्रमुखांचे काम आहे का?” असा सवालही त्यानी उपस्थित केला.
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सीएएविरोधी आंदोलकांवर टीका केली होती. रावत म्हणाले “लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे कधीच नेते होऊ शकत नाही.





