\n

‘महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते’
\n“बीडमधील एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियाची ती टिप्पणी होती, अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते, मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे, एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

\n

“प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा. पण त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अनुत्तरीत राहते. त्याला मुख्यमंत्री/गृहमंत्री हे संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

\n

\"\"

\n

 ‘मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा जोपासली’
\n“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा गेली बारा वर्षे अत्यंत काळजीपूर्वक जोपासली आहे. त्यांचे महिलांच्या बद्दलचे उद्गार ‘५० करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य जगजाहीर आहेत.

\n

पण काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने नेहमीच देशात राजकारणाची पातळी सांभाळायचे काम केले आहे. अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या बाबत केला होता. पण इंदिराजींनी त्यांना कृतीने उत्तर दिले”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

\n

‘…कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा’

\n

“सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात कार्यरत असून राज्याच्या एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थातच त्यांच्याकडूनही कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे”, अशी स्पष्ट भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

\n

“या पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

\n

नेमकं प्रकरण काय?

\n

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यादरम्यान, पत्रकाराने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला.

\n

त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. या व्हिडिओवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ‘धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा?’, तर ‘सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील,’ असे ट्वीट काँग्रेसकडून शेअर करण्यात आले.  या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील नेत्यांनी काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप करत माफीची मागणी केली जात आहे.

\n

हेही वाचा: 

\n

Pune District : भटक्या आणि पाळीव श्‍वानांचे ‘रेबीज लसीकरण’

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Prithviraj Chavan: “पातळी सोडून बोलणे योग्य नाही” सुनेत्रा पवारांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख करण्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Prithviraj-Chavan-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Prithviraj-Chavan-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar#webpage","name":"Prithviraj Chavan: “पातळी सोडून बोलणे योग्य नाही” सुनेत्रा पवारांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख करण्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट","url":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar","inLanguage":"mr","description":"Prithviraj Chavan: माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे - पृथ्वीराज चव्हाण","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Prithviraj-Chavan-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/it-is-not-appropriate-to-cross-the-line-in-speech-prithviraj-chavan-clarifies-his-stance-regarding-the-gungi-gudiya-remark-about-sunetra-pawar","name":"Prithviraj Chavan: “पातळी सोडून बोलणे योग्य नाही” सुनेत्रा पवारांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख करण्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट"}}]}}}

Prithviraj Chavan: “पातळी सोडून बोलणे योग्य नाही” सुनेत्रा पवारांचा ‘गुंगी गुडिया’ उल्लेख करण्यावर पृथ्वीराज चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट