ढाका : देशातील निवडूक प्रक्रियेमध्ये सरकारची भूमिका महत्वाची असते. देशातील निवडणूक यंत्रणा कितीही तटस्थ असली, तरी सरकारच्या सहकार्याशिवाय देशात निवडणुका घेणे शक्य नाही, असे बांगलादेशातील मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासीर उद्दीन यांनी म्हटले आहे. निवडणुका घेण्यासाठी सरकारकडून पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची मदत निवडणूक आयोगाल्या घ्यावी लागते. त्यामुळे सरकारच्याच मदतीने आम्हाला निवडणुका घ्याव्या लागणार आहेत, असे ते म्हणाले. निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नसल्याची शंका पत्रकारांनी उपस्थित केली होती. त्यावर औपचारिक समन्वय ठेवला जात असल्याचे नासीर उद्दीन म्हणाले. निवडणुकांच्या वेळापत्रका बद्दलच्या निर्णयाची घोषणा योग्यवेळी केली जाईल. त्याची रचना पुर्ण झाल्यावर ही घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय निवडणूक पुढील वर्षी एप्रिलच्या पहिल्या सहामाहीत होतील, अशी घोषणा मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी या महिन्याच्या सुरुवातीला,केली आहे.