पिंपरी | मुळशीकरांना पोलीस ठाण्याशी संपर्क करणे झाले सोपे

हिंजवडी, ( वार्ताहार) “मुळशी तालुक्यातील ग्रामस्थांना पौड पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे आता सोपे झाले आहे. पोलीस ठाण्यातील बीएसएनएलचा जुना नंबर मागील काही वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.
त्यामुळे अनेकांना पोलसाशी संपर्क साधने अवघड होतं होते. सद्या तालुक्यात पूर्व पट्यातील काही गावामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर पौड पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी नागरिकांच्या सेवेसाठी तत्काळ ७५२२९९०१०० मोबाईल नंबर सुरू केला आहे.
या नंबरवरून तक्रारदार नागरिकांनी पोलिसांशी आवश्यकतेनुसार संपर्क करावा,” असे आवाहन गिरीगोसावी यांनी केले आहे.
ग्रामीण व दुर्गम भाग असलेल्या पौड ठाण्यात ग्रामस्थांना तातडीने फिर्याद देण्यासाठी किंवा गावातील दोन गटातील वाद, भांडणे अपघाताची माहिती देण्यासाठी बीएसएनएल कंपनीचा 020-22943233 हा लँडलाइन नंबर होता.
परंतु नेहमी खंडित होणाऱ्या सेवेमुळे हा फोन बंद झाल्याने मुळशीकरांना पोलिसांशी संपर्क साधणे कठीण होत होते. तसेच ठाण्यातही दररोज ठाणे अंमलदार बदलत असल्याने नक्की कुणाशी संपर्क करावा, असा प्रश्न पडत होता.
गिरीगोसावी यांनी पोलिस निरीक्षक पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर त्यांनी तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले.
तालुक्यातील कानाकोपऱ्यातील ग्रामस्थांना तातडीच्या कारणांसाठी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधता यावा यासाठी हा नंबर सुरू केला आहे- हा मोबाईल २४ तास सुरू राहणार असल्याने ग्रामस्थांना पोलिस ठाण्याशी संपर्क करणे आता सोपे होणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मुळशीत सर्वत्र कौतुक होत असून हिंजवडी आयटी परिसरातून पुण्याला येजा करणारे कामगार ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीतून येजा करतात.
त्यामुळे अनेकांना अपघात किंवा अन्य घटना घडल्यास पौड पोलिसांशी संपर्क साधणे अवघड होत होते. त्यामुळे आता या सुविधेमुळे आयटीयन्स प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे.





