“सोमय्या पिता-पुत्राविरोधात लुकआउट नोटीस जारी करा”; संजय राऊत यांची मागणी

मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रागांत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या फरार आले असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी सोमय्या पिता-पुत्रविरोधात नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी आज एक ट्वीट करत,”सोमय्या हे त्यांच्या मुलासह फरारी असल्याचा दावा केला आहे. तसेच हे दोघे मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत? असा सवाल देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आणि मेहूल चोकसी याची जुनी दोस्ती आहे. मेहूल चोकसी जिथे आहेत, तिथे तरी सोमय्या गेले नाहीत का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित ?
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
या लोकांनी जनतेचा पैसा लुटला आहे. कारवाईच्या भितीने हे लोक देशाबाहेर पळून जाण्याची भिती वाटत आहे. यांची माफिया टोळी आहे. या प्रकरणावर भाजप काहीही बोलत नाहीत. विक्रांत प्रकरणी घोटाळ्याला भाजपचे समर्थन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती राज्य आणि देशव्यापी आहे. अजून काही प्रकरणे बाहेर पडतील असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या वक्तव्यावर सोमय्या काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे.





