ISSF World Cup Final 2024 : भारताच्या खात्यात आणखी 2 पदके, विवानने रौप्य तर अनंतने जिंकलं कांस्यपदक…

ISSF World Cup Final 2024 : देशाची राजधानी दिल्लीत सध्या ISSF विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. आज या स्पर्धेत विवान कपूरने पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदक तर देशबांधव अनंत जीतसिंग नारुका याने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यासह ISSF विश्वचषक फायनल स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या 4 वर पोहचली आहे.
विवानने अंतिम फेरीत 44 गुण मिळवले आणि सुवर्णपदक विजेत्या चीनच्या यिंग क्यूईच्या मागे राहिला. तुर्कियेच्या टोल्गा एन ट्यून्सरने 35 गुणांसह कांस्यपदक जिंकले. विवानने पात्रता फेरीत 125 पैकी 120 गुण मिळवून सहा पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
BRONZE 🥉 for 🇮🇳 as Anantjeet Singh Naruka finishes 3rd in the men’s Skeet. First World Cup final medal for the talented youngster. Congratulations!🔥🎊🎉👏#ISSFWorldCupFinalNewDelhi2024 #Skeet pic.twitter.com/aNNdycYgER
— NRAI (@OfficialNRAI) October 17, 2024
तत्पूर्वी, राजस्थानच्या 26 वर्षीय नारुकाने सहा पुरुषांच्या अंतिम फेरीत 43 गुणांसह तिसरे स्थान पटकावले, तर इटलीच्या तामारो कॅसांड्रो आणि गॅब्रिएल रोसेट्टी यांनी अनुक्रमे 57 आणि 56 गुणांसह सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. नारुकाने पात्रता फेरीत 125 पैकी 121 गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
Excellent silver🥈 for Vivaan Kapoor 🇮🇳 🔥 in men’s trap to conclude proceedings. Congratulations!🎊🎉👏#ISSFWorldCupFinalNewDelhi2024 pic.twitter.com/h5ibADrGNF
— NRAI (@OfficialNRAI) October 17, 2024
दरम्यान, या स्पर्धेत सोनम मस्करने मंगळवारी महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले होते आणि अखिल शेओरानने बुधवारी पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले होते.



