ISRO : इस्रोकडून स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वीपणे उड्डाण

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने सोमवारी रात्री स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वीपणे उड्डाण करत आणखी एक मोठी झेप घेतली आहे. या यशस्वामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा अंतराळ डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळविणारा चौथा देश ठरला आहे. वर्कहॉर्स पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) रॉकेटचा वापर करून या मोहिमेमध्ये दोन खास डिझाइन केलेले उपग्रह प्रक्षेपित करणे समाविष्ट आहे.
प्रत्येकाचे वजन अंदाजे 220 किलो आहे. अंतराळात सॅटेलाइट डॉकिंगची जटिल कला प्रदर्शित करणारी, मोहीम ग्राउंडब्रेकिंग स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट सह भारताने नवीन इतिहास रचला आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात रात्री 9.58 वाजता प्रेक्षपण करण्याचे नियोजित होते.
परंतु इस्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यात बदल करत रात्री 10 वाजता स्पेडेक्सचे यशस्वीपणे उड्डाण केले. तथापि, फेरनिश्चितीच्या कारणामागील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ही मोहिम देशाच्या अंतराळ संशोधन क्षमतेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.





