अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलचा हाय अलर्ट
Updated On:

जेरूसेलम : अमेरिकेने इराकमध्ये हवाई हल्ले करून इराणच्या लष्कर प्रमुखांना ठार केल्यानंतर मध्य पुर्वेतील अमेरिकेचा जवळचा साथीदार असणाऱ्या इस्रायलने आपल्या लष्कराला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.
इराण या हल्ल्याचा बदला म्हणून हमास, लेबॅनॉन दहशतवादी गटांना पाठींबा देऊन घातपाती कृत्ये घडवू शकते. सोलेइमानी आणि अबु महदी अल-मुहानदीस यांचा इराकच्या राजधानीत केलेल्या कारवाईत मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली आहे.
ते योग्य बदलासाठी वेळ घेतील. सिरीयातील शिया दहशतवादी गोळीबार करू शकतात, अशी शक्यता इस्रायली सामरिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इस्रायलसाठी सोलेइमानी हा मोठा धोका होता. कुद दलाने गेल्या वर्षी केलेला हल्ल्याचा सुत्रधार तोच होता. या हल्ल्यात हिझबुल्ला येथून रॉकेट डागण्यात आली होती.





