Israel US Iran War: इराण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ४ अमेरिकन सैनिकांचे फोटो प्रसिद्ध ; एका महिला सैनिकाचाही समावेश
Israel US Iran War: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सध्या जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. कारण या युद्धाचे पडसाद हे जगातील प्रत्येक देशावर पडताना दिसून येत आहेत.

Israel US Iran War: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सध्या जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. कारण या युद्धाचे पडसाद हे जगातील प्रत्येक देशावर पडताना दिसून येत आहेत. त्यातच या युद्धात तिन्ही देशांना जीवितहानी पोहचत आहे. इराणमध्ये साध्य जास्त नरसंहार सुरु आहे. यामध्ये अमेरिकेला देखील फटका बसला आहे.
पेंटागॉनने आज इराण युद्धात मारल्या गेलेल्या चार अमेरिकन सैनिकांची ओळख पटवली आणि त्यांचे फोटो प्रसिद्ध केले. कुवेतमधील पोर्ट शुएबा येथील कमांड सेंटरवर इराणी ड्रोन हल्ल्यात हे सैनिक मारले गेले. या हल्ल्यात एकूण सहा सैनिक मारले गेले, परंतु अद्याप दोघांची ओळख पटलेली नाही.
सैनिक १०३ व्या सस्टेनमेंट कमांड युनिटमध्ये तैनात Israel US Iran War
पेंटागॉनने सांगितले की हे चार सैनिक आयोवाचे होते आणि ते आर्मी रिझर्व्हच्या १०३ व्या सस्टेनमेंट कमांड युनिटमध्ये तैनात होते. हे युनिट सैनिकांना अन्न, पाणी, इंधन, दारूगोळा आणि वाहतूक यासारख्या आवश्यक वस्तू पुरवते. हा हल्ला रविवारी झाला आणि पेंटागॉनने आज याची माहिती जाहीर केली.
* कॅप्टन कोडी खोर्क, ३५, आयोवा
* सार्जंट फर्स्ट क्लास नोआ टिएटजेन्स, ४२, आयोवा
* सार्जंट फर्स्ट क्लास निकोल अमोर, ३९, आयोवा
* सार्जंट डेक्लान कोडी, २०, आयोवा
हे चारही सैनिक एकाच युनिटचे होते आणि त्यांनी आपल्या देशाच्या सेवेत आपले प्राण गमावले. पेंटागॉनने त्यांचे फोटो जारी केले आहेत, ज्यामध्ये ते त्यांच्या गणवेशात दिसत आहेत.
युद्धात आणखी मृत्यू होऊ शकतात – ट्रम्प
लष्कर सचिव डॅनियल ड्रिस्कॉल यांनी या घटनेबद्दल माहिती देताना, “या सर्व शूर पुरुष आणि महिलांनी त्यांच्या देशाचे रक्षण करण्यासाठी स्वेच्छेने काम केले. आम्ही त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही.”असे म्हणाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही टिप्पणी केली की, हे युद्ध संपण्यापूर्वी दुर्दैवाने आणखी मृत्यू होऊ शकतात. असेच घडते.
अमेरिका जाणूनबुजून युद्ध भडकवतय – इराण Israel US Iran War:
इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे. भारत, चीन आणि रशियासारख्या उदयोन्मुख शक्तींची प्रगती रोखण्यासाठी अमेरिका जाणूनबुजून जगभरात संघर्ष भडकवत असल्याचे इराणचे म्हणणे आहे.
इराणच्या सर्वोच्च नेत्याचे विशेष प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी सांगितले की अमेरिकेचे खरे लक्ष्य इराण नाही, तर इतर देश बळी पडू शकतात. तरीही,इराणने आदरणीय अटींवर वाटाघाटीसाठी तयारी दर्शविली आहे.






