इस्रायल खुली करणार रफाह सीमा; पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाऊ देणार

Updated On:
इस्रायल खुली करणार रफाह सीमा; पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाऊ देणार

जेरुसलेम : गाझामधील पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाण्यासाठी इस्रायल रफाह सीमा खुली करणार आहे. युद्धबंदीतल्या तरतूदींचा भाग म्हणून इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान हमासकडून परत मिळालेला मृतदेह हा उर्वरित ओलिसांपैकी कोणाचाही नसल्याचे फॉरेन्सिक तपासणीनंतर निष्पन्न झाल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. तर दुसरीकडे उर्वरित दोन ओलिसांपैकी आणखी एकाचा मृतदेह परत देण्याची तयारी हमासने दाखवली आहे.

हा मृतदेह बुधवारी रेडक्रॉसच्या माध्यमातून परत दिला जाणार आहे. पण हा मृतदेह दोनपैकी नक्की कोणाचा आहे, हे हमासकडून स्पष्ट केले जाऊ शकलेले नाही. आता इस्रायलच्या ओलिसांपैकी इस्त्रायली नागरिक असलेल्या रान ग्विली आणि थाई नागरिक असलेल्या सुदथिसक रिंथलक या केवळ दोघांचे मृतदेह हमासकडून परत मिळणे बाकी आहे. ते परत मिळाल्यानंतर युद्धबंदीचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. पण मिळालेल्या मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केल्यावर तो ओलिसांचाच असल्याचे निष्पन्न झाले, तरच पहिला टप्पा पूर्ण झाला असे मानले जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे.

रफाह सीमा उघडली गेल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी पॅलेस्टिनी बाहरे जाऊ शकणार आहेत. गाझा पट्ट्यामध्ये किमान १६,५०० आजारी आणि जखमी पॅलेस्टिनी असून त्यांना उपचारांसाठी गाझा पट्ट्यातून बाहेर काढले जाणे आवश्‍यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एका मृतदेहाची डीएनए तपासणी झाल्यावर तो ओलिसाचा नसल्याचे लक्षात आल्यामुळे इस्रायलने हा आग्रह धरला आहे.

रफाह सीमेतून पॅलेस्टिनींना केवळ बाहेरच जाता येऊ शकेल. या सीमेतून आत येता येणार नाही, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण जर या सीमेवरून दोन्ही बाजूंनी वाहतूक झाली, तरच दुसऱ्या बाजूकडून रफाह सीमा उघडली जाईल, असे इजिप्तने म्हटले आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

US in middle east war: मध्यपूर्वेतील युद्धात अमेरिकेपासून इस्रायल झाला वेगळा? ; ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर नेतान्याहू यांची मोठी घोषणा

2026-04-01 13:05:35

US in middle east war: मध्यपूर्वेतील युद्धात अमेरिकेपासून इस्रायल झाला वेगळा? ; ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर नेतान्याहू यांची मोठी घोषणा

Narendra Modi : "युद्धाच्या परिस्थितीत भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2026-03-31 22:29:45

Narendra Modi : "युद्धाच्या परिस्थितीत भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Iran US War: युद्ध चिघळणार! 'पाक जिहाद युद्ध' म्हणत हुथींकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

2026-03-29 13:07:33

Iran US War: युद्ध चिघळणार! 'पाक जिहाद युद्ध' म्हणत हुथींकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा

US Israel Iran War: अमेरिकेने इराणच्या खात्म्याचा बनवला 'मास्टर प्लॅन' ; अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू, नेमकं काय करणार ट्रम्प?

2026-03-29 11:05:41

US Israel Iran War: अमेरिकेने इराणच्या खात्म्याचा बनवला 'मास्टर प्लॅन' ; अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू, नेमकं काय करणार ट्रम्प?

Iran and US-Israel Conflict: पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सशी साधला संवाद; होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेवर एकमत

2026-03-28 22:48:41

Iran and US-Israel Conflict: पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सशी साधला संवाद; होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेवर एकमत