Israel Kills Iranian Intelligence Minister: इस्रायल आणि अमेरिकेसोबत गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धात इराणला अनेक मोठ्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येनंतर अवघ्या २४ तासांतच, देशाचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांच्या मृत्यूचा दावाही करण्यात आला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी अधिकृतपणे हे जाहीर केले. त्यांनी, इराणच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख आता हयात नसल्यचे म्हटले आहे. इस्माईल खतीब यांनी या कारवाईची पुष्टी करणारा एक कडक संदेश जारी केला. त्यात त्यांनी म्हटले होते की, त्यांनी आणि पंतप्रधान नेतान्याहू यांनी इस्रायलच्या संरक्षण दलाला (IDF) स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याबद्दल गुप्त माहिती आणि कारवाईसाठी ‘संधी’ मिळताच, कोणत्याही पुढील परवानगीशिवाय त्यांना तात्काळ संपवण्यात यावे. Israel Kills Iranian Intelligence Minister काट्झ यांनी इशारा दिला आहे की, आज सर्व आघाड्यांवर अनेक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण घटना घडताना दिसतील. इस्माईल खतीब कोण होते? Israel Kills Iranian Intelligence Minister: इस्माईल खतीब हे इराणच्या शक्तिशाली गुप्तचर मंत्रालयाचे (MOIS) प्रमुख होते. सूत्रांनुसार, खतीब यांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात मंत्रालयातील इतर चार वरिष्ठ अधिकारीही ठार झाले. तथापि, इराणने अद्याप खतीब यांच्या मृत्यूवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुष्टी दिलेली नाही. इराणच्या नेतृत्वाचा मोडलेला कणा Israel Kills Iranian Intelligence Minister मंगळवारी, इस्माईल खतीब यांच्या एक दिवस आधी, इराणच्या सुरक्षा धोरणातील प्रमुख व्यक्ती आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांचीही हत्या करण्यात आली. लारीजानी हे केवळ सुरक्षा धोरणांचे तज्ज्ञच नव्हते, तर पाश्चात्य देशांसोबतच्या अणु वाटाघाटींमध्ये ते इराणचे प्रतिनिधित्वही करत होते. या हल्ल्यात त्यांचा मुलगा, मोर्तेझा लारीजानी, आणि त्यांच्या कार्यालयाचे प्रमुख, अलीरेझा बायात, हे देखील ठार झाले. इस्रायलने त्यांचे वर्णन इराणी राजवटीचे सर्वात प्रभावी नेते असे केले होते. ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणमधील संकट Israel Kills Iranian Intelligence Minister: एका अहवालानुसार, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अंदाजे ४० वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. या हल्ल्यांचा मुख्य उद्देश इराणची लष्करी कमांड, क्षेपणास्त्र तळ आणि सर्वोच्च नेतृत्व पूर्णपणे खिळखिळे करणे हा आहे. आतापर्यंत ठार झालेल्या प्रमुख नेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: अयातुल्ला अली खामेनी : इराणचे सर्वोच्च नेते (२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात निधन) अली शमखानी : सुरक्षा सल्लागार. मोहम्मद पाकपूर : आयआरजीसी कमांडर. अझीझ नासिरझादेह : संरक्षण मंत्री. अब्दोलरहीम मुसावी : सशस्त्र दलांचे प्रमुख. तज्ज्ञांच्या मते, सर्वोच्च नेते खामेनी, लारीजानी आणि आता खतीब यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यांची हत्या हा इराणी राजवटीसाठी कधीही भरून न येणारा धक्का आहे, ज्याला इस्रायल एक मोठा विजय मानतो.