Israel Election : इस्रायलमधील निवडणुकीत गैरव्यवहार नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
इस्रायलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीमध्ये (Israel Election) कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आढळलेले नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Israel Election : इस्रायलमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीमध्ये (Israel Election) कोणताही गैरव्यवहार झाल्याचे आढळलेले नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणुकीत अपेक्षित विजय न मिळाल्याने पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या पक्षाच्यावतीने हा गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या या स्पष्टीकरणामुळे नेतान्याहू यांना धक्का बसला आहे.
या निवडणुकीत (Israel Election) नेतान्याहू यांच्या धार्मिक राष्ट्रवादी गटाला संसदेतील बहुमत गमवावे लागले. तर अरब नेतृत्वाखालील पक्षांना भरीव फायदा मिळाला. मात्र अरब नेतृत्वाच्या राजकीय पक्षांनी विदेशी शक्तींच्या मदतीने निवडणुकीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप नेतान्याहू आणि त्यांच्या पाठिराख्यांकडून सातत्याने केला जात होता.
या निवडणुकीत प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर निवडणुकीच्या प्रामाणिकपणामध्ये आणि परिणामांवर प्रबाव टाकू शकेल, असा कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा मिळू शकला नाही, असे निवडणूक (Israel Election) कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
निवडणूक कमिटीने प्रत्येक तक्रारीची वैयक्तिकरित्या आणि सखोल छाननी केली. मात्र निवडणुकीचे निकाल अवैध असल्याच्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा मिळू शकला नाही, असे निवडणूक कमिटीचे प्रभारी संचालक डीन लिवेन यांनी सांगितले.






