ISIS terrorist arrested। झारखंडची राजधानी रांचीमधून आज मोठी बातमी समोर आली आहे. राज्याची राजधानी रांची याठिकाणी एका संशयित आयसिस दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली स्पेशल सेलची टीम बऱ्याच दिवसांपासून या संशयित दहशतवाद्याचा शोध घेत होती. आता दिल्ली स्पेशल सेल, झारखंड एटीएस, रांची पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित व्यक्तीला रांची येथून अटक करण्यात आली आहे. संशयित दहशतवाद्याची चौकशी सुरू ISIS terrorist arrested। झारखंडची राजधानी रांची येथून अटक करण्यात आलेल्या संशयित आयसिस दहशतवाद्याचे नाव अशर दानिश आहे. त्याला रांचीतील इस्लामनगर येथून अटक करण्यात आली आहे. अशर दानिश हा बोकारो जिल्ह्यातील पेटवार येथील रहिवासी आहे. दिल्लीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे दिल्ली स्पेशल सेलची टीम त्याचा शोध घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याची चौकशी केली जात आहे. दिल्लीतूनही अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची माहिती ISIS terrorist arrested। माहितीनुसार, देशातील विविध राज्यांमध्ये १२ हून अधिक ठिकाणी स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींकडून छापे टाकण्यात येत आहेत. दिल्लीतूनही आयसिस दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आफताब असे आहे. माहितीनुसार, ८ हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.