हैदराबादमध्ये दहशत माजवण्याचा कट अयशस्वी ; ISIS शी संबंधित २ संशयितांना अटक, स्फोटकेही जप्त

ISIS suspects arrested । तेलंगणा पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. हैदराबाद शहरात बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या या संयुक्त कारवाईत, ISIS शी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. यापैकी विजयनगरम येथील सिराज आणि हैदराबाद याठिकाणचा समीर याला अटक करण्यात आली आहे. हे लोक हैदराबादमध्ये डमी बॉम्बस्फोटाची योजना आखत होते असा आरोप करण्यात आला आहे. ISIS suspects arrested ।
या योजनेअंतर्गत, सिराजने विजयनगरममध्ये स्फोटक साहित्य खरेदी केले. दोघांनाही सौदी अरेबियातील आयसिस मॉड्यूलकडून सूचना मिळाल्या होत्या, जे त्यांना हैदराबादमधील हल्ल्यांसाठी मार्गदर्शन करत होते. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तेलंगणा काउंटर इंटेलिजेंस आणि आंध्र प्रदेश इंटेलिजेंसच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. ISIS suspects arrested ।





