पिंपरी | ईशप्रीतने बॉक्सिंग स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे पार पडल्या. या स्पर्धेत ईशप्रीत कटारियाने सुवर्णपदक जिंकले.
स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता केदारी, बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काकडे, अध्यक्ष रघुनाथ खेडेकर, सदस्य रमेश शेट्टी व मनोज यादव स्पर्धा प्रमुख क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे उपस्थित होते.
या स्पर्धाेमध्ये १४, १७, १९ वर्ष मुले व १७, १९ वर्षे मुली या वयोगटात खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत १४५ शाळेतील ४२३ खेळाडूंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. ईशप्रित कटारिया या खेळाडूंनी वजन गट ६३ या वजन गटात १९ वर्षाखालील गटात सुवर्णपदक प्राप्त केले.
म्हणून सरस्वती भवन इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव स्कूलच्या वतीने, तिचा सत्कार शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी सेक्रेटरी राजेश मुख्याध्यापिका सिमा यांनी केला. ईशप्रित कटारियाने आतापर्यंत अनेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेली आहेत.
तिच्या या यशा पाठीमागे तिचे वडील जितू कटारिया व आजोबा सुरेश कटारिया हे तिच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत व वडील जितू कटारिया हे तिला बॉक्सिंगचे धडे देत आहेत.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन सुनीता पालवे यांनी केले. राजेंद्र सोनवणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ऋषिकेश वचकल, कविता पाचारणे, दत्तात्रय मिसाळ, दिलीप धनवटे, प्रभाकर पाडाळे, हनुमंत पारखी यांनी स्पर्धा संयोजनाचे कामकाज पाहिले.





