पाकचे मोडले कंबरडे ! युद्धावर चर्चा नाही तर सिंधूच्या पाण्यासाठी भारताकडे विनवणी

Ishaq Dar । भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर परिस्थिती सामान्य झाली असली तरी, दोन्ही देशातील तणाव मात्र कायम आहे. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी, “दोन्ही देशांमधील सध्याची परिस्थिती पाहता, पुन्हा लष्करी संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे” असे मोठे विधान केले आहे.
इस्लामाबादमध्ये स्थानिक माध्यमांशी बोलताना दार यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी आपण भारतासोबत बोलण्यासाठी तयार आहोत पण तो चर्चेसाठी उतावीळ नसल्याचे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी,”जेव्हा जेव्हा ते (भारत) चर्चेची मागणी करतात तेव्हा ती कोणत्याही पातळीवर असू शकते त्यासाठी आम्ही तयार आहोत पण त्यासाठी एकदम आतुर नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारताला फक्त दहशतवादावर लक्ष केंद्रित करायचे Ishaq Dar ।
पुढे ते म्हणाले,”पाकिस्तानला भारतासोबत पाण्यासह विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा हवी आहे, तर भारताला फक्त दहशतवादावर लक्ष केंद्रित करायचे आहे. हे असा होऊ शकत नाही. आपल्यापेक्षा कोणीही गंभीर नाही. याला दोन्ही देश जबाबदार आहेत.” भारतासोबत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता विचारली असता, दार म्हणाले की ते भविष्य सांगू शकत नाहीत परंतु अशा कोणत्याही परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे. युद्धबंदी अबाधित आहे आणि दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याशी संबंधित सर्व पावले अंमलात आणली आहेत. अशा परिस्थितीत, माझ्या मते नवीन संघर्ष होण्याची शक्यता नाही.
पहलगाम हल्ल्याने दोन्ही देशातील संबंध बिघडले Ishaq Dar ।
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारत सरकारने पाकिस्तानवर सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. ७ मे रोजी सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले, त्यानंतर पाकिस्तानने संघर्ष आणखी वाढवला. यानंतर, पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमधील लष्करी आणि निवासी क्षेत्रांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. पण १० मे रोजी अचानक युद्धबंदीची घोषणा करण्यात आली.





