“पुढच्या आयपीएलमध्ये देखील..” इशांत शर्माने दिले Rishabh Pant च्या फिटनेस बाबत महत्वाचे अपडेट

नवी दिल्ली – बीसीसीआयने ऋषभ पंतच्या आरोग्य आणि फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट दिला आहे. पंतने कीपिंग आणि फलंदाजी या दोन्हींचा सराव सुरू केल्याचे बोर्डाने म्हटले होते. या बातमीने सर्व भारतीय चाहत्यांना दिलासा मिळाला. मात्र, दिल्ली कॅपिटल्समध्ये पंतसोबत खेळणाऱ्या इशांत शर्माने दिलेले अपडेट खूपच धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे.
जिओ सिनेमाच्या वतीने इशांत शर्मा भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात कॉमेंट्रीची जबाबदारी सांभाळत आहे. यावेळी त्याला विचारण्यात आले की, पंत कधीपर्यंत मैदानात परतणार आहे? याला उत्तर देताना इशांत म्हणाला, “मला वाटतं पुढच्या आयपीएलमध्ये देखील ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. कारण ही दुखापत छोटी नाही. हा एक अतिशय गंभीर अपघात आहे. त्याने नुकतीच फलंदाजी आणि यष्टिरक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र धावणे आणि वेगवान हालचाल करणे फिरणे यासह अनेक गोष्टी आहेत, ज्या करण सोपं नाही.
इशांत शर्माने पंत विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त राहण्याची शक्यता असलेल्या सर्व अटकळांचे खंडन केले. तो म्हणाला, “चांगली गोष्ट म्हणजे त्याला दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली नाही. जर त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली असती तर तो बराच काळ बाहेर राहिला असता. त्याच्यावर आता एक शस्त्रक्रिया झाली आहे, पण मला वाटत नाही की तो विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल. मी प्रार्थना करतो की तो आयपीएलसाठी तंदुरुस्त होईल असं इशांतनं म्हंटल.





