Ishan Kishan Six : इशान किशनचा कहर; चिन्नास्वामीवर एक असा षटकार ठोकला, चेंडू थेट छतावरून बाहेर पडला, VIDEO होतोय व्हायरल
Ishan Kishan Six : भारताने ७.४ षटकापर्यंत दमदार फलंदाजी करत धावसंख्या ५ गडी बाद ११८ धावांपर्यंत पोहोचवली होती. यानंतर पुन्हा पाऊस सुरु झाला, ज्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

Ishan Kishan Smashes Monstrous Six Out of Chinnaswamy Stadium India Fastest Fifty in T20Is : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात चौकार आणि षटकारांची तुफानी आतषबाजी पाहायला मिळाली. पावसामुळे सव्वा दोन तास उशिराने सुरू झालेला हा सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशन याने विंडीजच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली. दुसऱ्याच षटकात त्याने असा गगनचुंबी षटकार लगावला की चेंडू थेट स्टेडियमबाहेर जाऊन हरवला.
रोमारियो शेफर्डची धुलाई; चेंडू थेट स्टेडियमबाहेर –
डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या रोमारियो शेफर्डविरुद्ध इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला. या षटकात त्याने दोन उत्तुंग षटकार आणि दोन दमदार चौकार ठोकले. विशेषतः तिसऱ्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला दुसरा षटकार इतका लांब होता की चेंडू थेट एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावरून बाहेर रस्त्यावर गेला. चेंडू सापडलाच नाही, त्यामुळे पंचांना मैदानात नवा चेंडू मागवावा लागला. नवा चेंडू येताच इशानने त्यावरही चौकार ठोकत विंडीजच्या गोटात दहशत निर्माण केली.
अवघ्या १० चेंडूंत ३० धावांची वादळी खेळी –
ROOF? CONSIDER IT CLEARED! 😌
#IshanKishan went big, sending Romario Shepherd’s delivery 𝙤𝙪𝙩 𝙤𝙛 𝙩𝙝𝙚 𝙜𝙧𝙤𝙪𝙣𝙙! 🤯
#INDvWI 5th T20I | LIVE NOW 👉 https://t.co/gTLfW1nlUI https://t.co/qXnWpzZor9
— Star Sports (@StarSportsIndia) October 17, 2026
इशान किशनने तिसऱ्या षटकाची सुरुवातही चौकाराने केली; मात्र तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने अवघ्या १० चेंडूंत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३०० च्या स्ट्राईक रेटने ३० धावांची वादळी खेळी साकारली. त्याने निर्माण केलेल्या या प्रचंड गतीमुळे भारतीय संघाला ९ षटकांच्या मर्यादित सामन्यात हवी तशी स्फोटक सुरुवात मिळाली.
१७ चेंडूंत भारताचे सर्वात जलद अर्धशतक; नवा विक्रम
Into the orbit 🚀
Ishan Kishan got the Bengaluru crowd going with a quick-fire 3⃣0⃣(10) 🎇
Updates ▶️ https://t.co/hpGnrNyZVS
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ishankishan51 https://t.co/CdeDA9r87n
— BCCI (@BCCI) October 17, 2026
इशानच्या या आक्रमक पवित्र्यामुळे भारतीय संघाने अवघ्या २.५ षटकांत म्हणजेच फक्त १७ चेंडूंत आपल्या ५० धावा फलकावर लावल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हे भारताचे सर्वात वेगवान सांघिक अर्धशतक ठरले आहे. भारताने मागील हैदराबाद सामन्यातच १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता, तो विक्रम बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर अवघ्या दोन दिवसांतच मोडीत निघाला.
निर्णायक पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द –
It’s all over in Bengaluru ☔️☔️
The hard-fought T20I series fittingly ends 2-2 after the decider is washed out #INDvsWI https://t.co/QjP6DLGz5v
— Cricbuzz (@cricbuzz) October 17, 2026
पाचवा आणि निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मैदान कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पाऊस थांबला आणि सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने ७.४ षटकांत ५ गडी गमावून ११८ धावा केल्या होत्या, तेव्हा पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. यानंतर खेळ अशक्य झाला आणि दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन करून सामना रद्द करण्यास सहमती दर्शवली. यासह, ५ सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.





